Moonrise from Eastern Bay
होळी पौर्णिमेच्या संध्याकाळी पॉंडिचेरीतून समुद्रक्षितिजावरून उगवणारा चंद्र
•1 min read•
experiences, travel
होळी पौर्णिमेच्याच संध्याकाळी पॉंडीचेरीमधल्या समुद्रकिनाऱ्यावरून चंद्रोदय पाहायला मिळाला.
जवळजवळ २३ वर्षांच्या आयुष्यात समुद्राच्या क्षितिजावरून चंद्रोदय होऊ शकतो, ही कल्पना माझ्या कोकणातल्या मुंबईकर डोक्यात अतिशयोक्ती म्हणूनसुद्धा कधी शिवली नाही.
अख्या आयुष्यात इमारतीच्या, झाडाच्या, किंवा फारतर फार डोंगराच्या मागून उगवणारा चंद्र जेव्हा क्षितिजावरून आला, तेव्हा सगळे विश्वास, श्रद्धा, आणि अनुभव किती फोल आहेत ह्याची जाणीव झाली. आणि जे दिसतंय ते डोळ्यात, मनात, आणि पर्यायाने कॅमेरात जपण्याचा प्रयत्न करण्यावाचून काहीच करू शकलो नाही.